पुणे जिल्ह्यात नसरापूर गावामध्ये एका साडेतीन वर्षांच्या चिमुकल्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे
BM NEWS
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावात चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या घटनेनं राज्यभरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी माहिती मिळताच तातडीने हालचाल करून दीड तासांच्या आत आरोपीला अटक केली. त्याच्यावर पॉक्सो कायदा आणि खूनासह गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरोधात यापूर्वीही विनयभंगाचे गुन्हे नोंदले गेले होते.
घटनेनंतर गावकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले असून परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोपीला शक्य तितक्या लवकर मृत्युदंड देण्याची मागणी न्यायालयात करण्याचे सांगितले आहे.
राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक पक्षातील नेत्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. शिवसेना खासदार ज्योती वाघमारे, राष्ट्रवादी पक्षाच्या रोहिणी खडसे, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे, भाजप आमदार चित्रा वाघ आणि आमदार रोहित पवार यांनीही आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

रोहित पवार यांनी राज्यात वाढत्या अशा घटनांबाबत चिंता व्यक्त करत “शक्ती कायदा” तातडीने लागू करण्याची मागणी केली आहे.
सद्यस्थितीत पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू असून हा मामला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची तयारी सुरू आहे.


