——————————–
अहमदपूर दि.( प्रतिनिधी): येथील प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव मोठ्या उत्सव साजरा करण्यात आला. याबाबत अधिक माहिती अशी की, येथील यशवंत प्राथमिक शाळेमध्ये आज शाळा सुरू होण्याचा पहिला दिवस असल्याने पहिलीच्या विद्यार्थ्यांचे व इतर विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन व पुस्तके देऊन आनंदात सह साजरा करण्यात आला यावेळी अनेक पालक उपस्थित होते. पालकांचे हे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी भिंतीवर वेगवेगळ्या ठिकाणी फुगे

चिटकवण्यात आलेले होते त्याचबरोबर ठिकाणी पुष्पहारर लावण्यात आलेले होते. भिंती,झाड या सगळ्यावर फुगे लावून एक वेगळा चैतन्य निर्माण करण्यात आलेला होतं. सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक विलास चापोलीकर, माधव भोजराज पाटील, बिरादार एस. एस., बिरादार व्ही.व्ही, श्रीमती गौंड अश्विनी मॅडम, श्रीमती शिवशक्ती हिप्पाळे मॅडम, श्री आनंद बिरादार, श्री संदीप पांचाळ, यशवंत कोलपूसे, शेख एम. एम., रवींद्र गेडाम, ए.बी. बिरादार, राजे अनिता मॅडम, रेखा जोगदंड,बी.बी. शेवाळे, महानंदा हैबतपूरे, शेख एम. एम.,बाळासाहेब करंजकर, किरण आष्टे, पी.पी. मोरे, सोपान बडगिरे, बबनराव गोरगीळे आदी मान्यवर उपस्थित होते


