HomeBIG BREKING80 वर्षीय समाजसेवक मृत्यूच्या दारात, तरीही प्रशासन झोपेत! न्यायासाठी तिसऱ्या दिवशीही आमरण...

80 वर्षीय समाजसेवक मृत्यूच्या दारात, तरीही प्रशासन झोपेत! न्यायासाठी तिसऱ्या दिवशीही आमरण उपोषण सुरू

अहमदपूर | प्रतिनिधी (BM NEWS)

अहमदपूर तालुक्यातील गुंजोटी येथील 80 वर्षीय ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते लिंबाजी पी. भुजंगराव नाईकवाडे (खुणे) यांनी राहत्या जागेचा प्रश्न निकाली काढावा आणि घराकडे जाणाऱ्या रस्त्याची व्यवस्था करावी, या मागणीसाठी सुरू केलेले आमरण उपोषण आज तिसऱ्या दिवशीही सुरू आहे. उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावत चालली असून, तरीही प्रशासनाकडून कोणतीही ठोस दखल घेण्यात आलेली नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

:

गेली 20 ते 25 वर्षे संबंधित जागेवर वास्तव्यास असूनही ती जागा त्यांच्या नावावर करण्यात आलेली नाही. यासाठी त्यांनी तहसील कार्यालयासह संबंधित विभागांकडे वारंवार निवेदने दिली, अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या, पाठपुरावा केला; मात्र प्रत्येकवेळी आश्वासनांचे गाजर दाखवण्यात आले आणि प्रत्यक्षात काहीच झाले नाही, असा त्यांचा आरोप आहे.

घराकडे जाणारा रस्ताही आजपर्यंत न झाल्याने विशेषतः पावसाळ्यात ये-जा करणे जीवघेणे ठरत आहे. वृद्धापकाळात स्वतःसह संपूर्ण कुटुंबाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असतानाही प्रशासनाकडून या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.

16 जुलै 2026 रोजी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, गुंजोटी येथे सुरू झालेल्या या आमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. उपोषणामुळे लिंबाजी नाईकवाडे यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असल्याची माहिती मिळत आहे. मात्र अद्याप एकाही वरिष्ठ अधिकाऱ्याने उपोषणस्थळी जाऊन त्यांची विचारपूस केली नसल्याचा आरोप होत आहे.

“जागा माझ्या नावावर करून द्या आणि घराकडे जाणाऱ्या रस्त्याची व्यवस्था करा; अन्यथा माझा जीव गेला तरी उपोषण मागे घेणार नाही,” अशी ठाम भूमिका लिंबाजी नाईकवाडे यांनी घेतली आहे.

उपोषणस्थळी ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे पदाधिकारी भेट देऊन पाठिंबा देत आहेत. प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही समर्थकांनी दिला आहे.

BM NEWS संपादकीय प्रश्न

एका 80 वर्षीय वृद्धाला न्याय मिळवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून आमरण उपोषण करावे लागते, ही शासन-प्रशासनासाठी लाजिरवाणी बाब नाही का? प्रशासनाला जाग येण्यासाठी एखाद्या निष्पाप जीवाची आहुतीच लागणार आहे का? जर या उपोषणादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडली, तर त्याची नैतिक जबाबदारी नेमकी कोण स्वीकारणार?

आज संपूर्ण अहमदपूर तालुक्याचे लक्ष प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे लागले असून, न्याय मिळतो की केवळ आश्वासनांची पुनरावृत्ती होते, हे येणारा काळच ठरवणार आहे.

BM Live News
BM Live News
बी एम न्यूज चॅनेलचे उद्देशपत्र “सत्य हाच आमचा धर्म, न्याय हाच आमचा ध्यास” बी एम न्यूज चॅनेल समाजाशी निगडित प्रत्येक प्रश्नाला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे. आमचे कार्यक्षेत्र केवळ बातम्या देण्यापुरते मर्यादित नसून, समाजातील उपेक्षित, गोरगरीब व वंचित घटकांचे प्रश्न सरकार व प्रशासनापर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे. आमचे प्रमुख उद्दिष्टे : 1. अन्यायाविरुद्ध लढा – समाजातील दुर्बल व वंचित घटकांवर होणारे अत्याचार, अन्याय व शोषण उघड करून त्यांना न्याय मिळवून देणे. 2. सरकारी धोरणांवर लक्ष – शासनाच्या विविध योजना व धोरणांचा खराखुरा लाभ जनतेपर्यंत पोहोचतो का, यावर प्रकाशझोत टाकणे. 3. प्रशासकीय जबाबदारी – सरकार व पोलीस प्रशासनाकडून होणारे गैरप्रकार, बेफिकिरी व चुकीचे निर्णय लोकांसमोर आणणे. 4. सामान्यांचा आवाज – शेतकरी, मजूर, बेरोजगार, महिला व तरुण यांच्या समस्या योग्य व्यासपीठावर मांडून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणे. 5. सत्यनिष्ठ पत्रकारिता – राजकीय दबाव वा आर्थिक स्वार्थ यापेक्षा समाजहिताला प्राधान्य देत निष्पक्ष आणि प्रामाणिक पत्रकारिता करणे. आमची वचनबद्धता : बी एम न्यूज चॅनेल सदैव समाजाच्या न्यायासाठी, सत्यासाठी आणि लोकशाहीच्या बळकटीसाठी काम करत राहील. गोरगरीबांचा आवाज बुलंद करण्याचे, अन्याय उघड करण्याचे आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याचे व्यासपीठ म्हणजे बी एम न्यूज.
RELATED ARTICLES
Jharkhand
light rain
28.1 ° C
28.1 °
28.1 °
71 %
2.4kmh
100 %
Fri
31 °
Sat
32 °
Sun
32 °
Mon
32 °
Tue
32 °

Most Popular