महिलांना आत्मनिर्भरतेकडे नेणारे पाऊल

BM NEWS
: BM NEWS
सुपे (बारामती)
युवा कौशल्य कृषी विकास बहुउद्देशीय संस्था, अहिल्यानगर यांच्या वतीने ‘श्री स्वामी समर्थ ट्रेनिंग सेंटर’ सुपे (ता. बारामती) येथे सुरू करण्यात आले. या केंद्राच्या उद्घाटन सोहळ्यास संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष माननीय ईश्वर निमसे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
निमसे यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांबाबत माहिती देत महिलांना आवाहन केले की, “महिलांनी संस्थेमार्फत कौशल्य प्रशिक्षण घेऊन स्वतःचा व्यवसाय उभारावा, संसाराला आर्थिक हातभार लावावा आणि उद्योजकतेचे स्वप्न साकार करावे. संस्था महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी कटिबद्ध आहे.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या बारामती तालुका बिझनेस मॅनेजर अश्विनी अमोल बर्गे यांनी केले. त्यांनीच हे प्रशिक्षण केंद्र सुरू केले असून, परिसरातील महिलांना आपल्या आवडीनुसार विविध कौशल्य प्रशिक्षण घेऊन प्रत्यक्ष जीवनात त्याचा लाभ मिळावा, हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे खजिनदार निलेश आखाडे, अवधूत घोरपडे, अमोल बर्गे, अजय सूर्यवंशी, गौरव जवळकर, गावातील मान्यवर व महिला उपस्थित होत्या.