बीड प्रतिनिधी :- मुंबई येथील नामांकित ज्ञान उदय फाऊंडेशन मिरा भाईंदर या संस्थेच्या वतीने पाटोदा येथील रोटी बॅकेचे संचालक तथा सामाजिक कार्यकर्ते संतोष गर्जे यांना राष्ट्रीय स्तरावरील राष्ट्रसाधना पुरस्काराने दिनांक 28 जून 2025 रोजी भारतरत्न गाणं सम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृहामध्ये गौरविण्यात आले.
पुरस्कार वितरण सोहळ्याचे मुख्य अतिथी सुभेदार श्री कुणालजी मालुसरे ( तानाजी मालुसरे यांचे वंशज ) , डॉ विजय दहिफळे, सुरेंद्रकुमार, कौशिक गायकवाड, पंडित ब्रिज नारायण राष्ट्रपती पदक विजेते, डॉ क्रांती महाजन, आचार्य प्रणव कुमार शास्त्री यांच्या हस्ते समाजसेवेतील उल्लेखनीय कार्याबद्दल संतोष गर्जे यांना राष्ट्रीय स्तरावरील राष्ट्रसाधना पुरस्काराने गौरविण्यात आले.
पाटोदा शहरात मागील ५ वर्षांपासून रोटी बॅकेच्या माध्यमातून गोरगरीब जवळपास 100 निराधारांना एक वेळेचे दुपारचं जेवण पाटोदा बस स्थानक येथे दिलं जातं आहे. यांची दखल घेऊन राष्ट्रीय स्तरावरील ज्ञान उदय फाऊंडेशन ने राष्ट्रीय स्तरावरील राष्ट्रसाधना पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे याबद्दल महासांगवी येथील संत मिराबाई आईसाहेब संस्थान च्या मठाधिपती हभप राधाताई आईसाहेब महाराज यांनी संतोष गर्जे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी उपसरपंच केशव गर्जे, जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती महेंद्र गर्जे, भाजप नेते मधुकर गर्जे, संतोष शिंदे, प्रा. अशोक नागरगोजे, दिपक गर्जे, स्वामी सानप, शिवाजी गर्जे, पाचेगाव चे सरपंच रविंद्र थोरात, पाटोदा तालुक्यातील गोशाळा संचालक नामदेव जगदाळे, रामहरी जाधव, मनोज चौरे व सागर तुपे पाटोदा पोलीस स्टेशन चे सहाय्यक निरीक्षक भगवान भाब्बड सह मित्र परिवार व रोटी बॅकेच्या लाभार्थींनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले, व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या
