अहिल्यानगर –HANUMANT JOGDAND
प्रथम एज्युकेशन फाउंडेशन, कामरगाव (अहिल्यानगर) यांच्या वतीने आपल्या गावातील १८ ते ३० वयोगटातील बेरोजगार आणि गरजूंना उद्देशून निवासी कौशल्य प्रशिक्षण व रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या उपक्रमाअंतर्गत विविध कौशल्य आधारित प्रशिक्षण देऊन युवक-युवतींना स्वावलंबी व रोजगारक्षम बनविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रशिक्षणानंतर निवडक उमेदवारांना रोजगार संधी देखील उपलब्ध करून देण्यात येतील.
🔹 विशेष सूचना:
अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी बार्टी तर्फे विद्यावेतन सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा.
📱 नोंदणी प्रक्रिया:
त्वरीत ऑनलाइन गूगल फॉर्म भरून नोंदणी करावी. जागा मर्यादित असल्याने लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील युवकांना कौशल्य व रोजगार यांचा संगम साधता येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
📍 आयोजक: प्रथम एज्युकेशन फाउंडेशन, कामरगाव, अहिल्यानगर