ईश्वर निमसे अहिल्यानगर- जयहिंद माजी सैनिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्याच्या वतीने आज अहिल्यानगरचे निवासी जिल्हाधिकारी श्री.दादासाहेब गीते व प्रांत अधिकारी श्री.सुधीर पाटील यांना शिक्षकाप्रमाणेच सैनिकांना पण आरक्षण मिळावे अशा आशयाचे निवेदन देण्यात आले.अखंड महाराष्ट्रामध्ये एकूण सात पदवीधर मतदार संघ आहेत. पदवीधरांची एकूण 90 हजार संख्याबळ असून, त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सैनिक/ अर्धसैनिकांची सरासरी वीस लाख मतदार संख्या असून, प्रत्येक सैनिक परिवारा मध्ये पाच मतदार आहेत,तर एकंदरीत एक कोटीच्या आसपास सैनिक मतदार आहेत. त्यांचा सकारात्मक विचार करून शासनाने महाराष्ट्रा मध्ये राखीव सैनिक मतदारसंघ स्थापन करावेत.
प्रत्येकी ग्रामपंचायत मध्ये एक सैनिक सदस्य, पंचायत समितीमध्ये एक सदस्य, जिल्हा परिषद मध्ये एक सदस्य, नगरपालिके मध्ये एक सदस्य, महानगरपालिके मध्ये एक सदस्य, राज्यपाल नियुक्त विधान परिषदेत एक सदस्य,राज्यपाल नियुक्त विधानसभेत एक सदस्य, राज्यसभे वरती एक सैनिक सदस्य, लोकसभेवर एक सैनिक सदस्य असे पक्के आरक्षण ध्यावे. अशा आशियाचे निवेदन मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडवणीस,मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य,राज्यपाल महाराष्ट्र राज्य,दोन्ही उपमुख्यमंत्री व सैनिक कल्याण मंत्री,यांच्या नावे जिल्हाधिकारी व उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयात देण्यात आले.
अहिल्यानगर विभागीय प्रांत अधिकारी श्री सुधीर पाटील यांनी आश्वासित केले की,आपली मागणी ही रास्त असून,नक्कीच याचा सकारात्मक विचार करून पुढे पाठपुरावा केला जाईल.
यावेळी सैनिक फेडरेशन अहिल्यानगरचे अध्यक्ष (रिटा) कर्नल सुनील राजदेव,जयहिंद माजी सैनिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मेजर निळकंठ उल्हारे,संस्थेचे कार्याध्यक्ष मेजर बाळासाहेब धांडे,त्रिदल सैनिक संघ निंबळकचे सचिव मारुती ताकपेरे मेजर,बाळासाहेब वाघ मेजर व आबासाहेब घुठे हे उपस्थित होते.
बी एम न्यूज चॅनेलचे उद्देशपत्र
“सत्य हाच आमचा धर्म, न्याय हाच आमचा ध्यास”
बी एम न्यूज चॅनेल समाजाशी निगडित प्रत्येक प्रश्नाला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे.
आमचे कार्यक्षेत्र केवळ बातम्या देण्यापुरते मर्यादित नसून, समाजातील उपेक्षित, गोरगरीब व वंचित घटकांचे प्रश्न सरकार व प्रशासनापर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.
आमचे प्रमुख उद्दिष्टे :
1. अन्यायाविरुद्ध लढा – समाजातील दुर्बल व वंचित घटकांवर होणारे अत्याचार, अन्याय व शोषण उघड करून त्यांना न्याय मिळवून देणे.
2. सरकारी धोरणांवर लक्ष – शासनाच्या विविध योजना व धोरणांचा खराखुरा लाभ जनतेपर्यंत पोहोचतो का, यावर प्रकाशझोत टाकणे.
3. प्रशासकीय जबाबदारी – सरकार व पोलीस प्रशासनाकडून होणारे गैरप्रकार, बेफिकिरी व चुकीचे निर्णय लोकांसमोर आणणे.
4. सामान्यांचा आवाज – शेतकरी, मजूर, बेरोजगार, महिला व तरुण यांच्या समस्या योग्य व्यासपीठावर मांडून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणे.
5. सत्यनिष्ठ पत्रकारिता – राजकीय दबाव वा आर्थिक स्वार्थ यापेक्षा समाजहिताला प्राधान्य देत निष्पक्ष आणि प्रामाणिक पत्रकारिता करणे.
आमची वचनबद्धता :
बी एम न्यूज चॅनेल सदैव समाजाच्या न्यायासाठी, सत्यासाठी आणि लोकशाहीच्या बळकटीसाठी काम करत राहील.
गोरगरीबांचा आवाज बुलंद करण्याचे, अन्याय उघड करण्याचे आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याचे व्यासपीठ म्हणजे बी एम न्यूज.