अहमदपूर दि.१२( सय्यद चांद): २१वे शतक हे संगणक व विज्ञानाचे योग म्हणून ओळखले जात आहे जागतिक दर्जाचे आव्हाने पेरण्यासाठी विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होणे आवश्यक आहे असे विचार गट संधान केंद्र अहमदपूरच्या विशेष तज्ञ डॉ. कामाक्षी पवार यांनी केले त्या यशवंत प्राथमिक शाळेत तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय भारतीय विज्ञान मेळाव्या मध्ये उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक विलास चापोलीकर हे होते यावेळी श्रीमती इंदुमती जोगदंड, एम.पी. गुंडरे, योगीराज, श्रीमती एम. एम. गुणाले आदि मान्यवर उपस्थित होत.

पुढे बोलताना डॉ. पवार म्हणाल्या,की तंत्रज्ञान हे सतत बदलत असते आणि सध्याचे युग हे तंत्रज्ञानाची योग्य आहे त्यामुळे बदलत्या तंत्रज्ञानानुसार भारताने देखील आधुनिक तंत्रज्ञान असणाऱ्या कॉटम कॉम्युटींग सारख्या क्षेत्राच्या विकासासाठी राष्ट्रीय कार्यक्रमाची निर्मिती केली आहे हे एक वेगाने उदयास येणारे तंत्रज्ञान असून जे शास्त्रीय संगणकाच्या अत्यंत गुंतागुंतीच्या समस्यांच्या निराकरण करण्यासाठी कॉटन मेकानिक्सच्या नियमांचा उपयोग करते
सदरील भाषण स्पर्धा ही आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली होती यावेळी “कॉटम युगाची सुरुवात शक्यता व आव्हाने” या विषयावर अनेक शाळांच्या विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडले.
एप्रिल कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पी. आर. उपाध्ये, श्रीमती पी.ए. सांगवीकर, व्ही.पी. डांगे,गिरी सर, जी.एम. कोइलवाड, श्रीमती पी.सी. राऊत सय्यद सर आदींनी परिश्रम घेतले